मित्र


मी आणी सचिमधला फरक फक्त दोन दिवसांचा तो ३ ऑगस्ट ला जन्मला आणि मी १ ऑगस्ट ला आमच्या दोघांची घरं समोर-समोर होती तेव्हा पासुनची आमची मैत्री .माझ्या प्रत्येक वाढदिवसाला त्याचा फोन येतो म्हणजे येतोच.मला अजही आठवत कि लहान असताना त्याच्या बर्थडे ला त्याच्या घरी माझ्या एकट्याची मित्र म्हणुन हजेरी असायची , आम्ही घर बदली केल्या नंतर सुद्धा आमचं एकमेकांच्या घरी  येणं - जाणं चालू असायचं.
आमच्या जन्माच्या वेळेस शोले पिक्चर ची चालती असेल कि काय आमच्या दोघांच्या घरच्यांनी आमची टोपन नावं जितेंद्र आणि धर्मेंद्र ठेवली होती,आजपण मला कोणी नाही पण त्याच्या घरचे जितू च म्हणतात आणि अजून एक पाऊल पुढे जाऊन कि काय त्याच नाव त्याच्या घरच्यांनी 'गब्बर ' ठेवल तेही शोले च्या गब्बर वरूनच आणि आज पण त्या नावाने त्याची अशोक नगर मध्ये ओळख आहे .
अजून एक किस्सा सांगायचं झाला सचिन ला आणि मला लहानपणी क्रिकेट खेळायचा खुप नाद होता आम्ही गल्लीतच क्रिकेट खेळायचो तर सचिन हा क्रिकेटर सचिन सारखा नाही तर यूव्ही सारखा खेळायचा कारण ज्या युवीने सहा बॉल वर सहा षटकार लावलेले त्याच प्रमाणे या माझ्या मित्राने  मी टाकलेल्या ओव्हर वरती पण सहा षटकार मारले होते मी ते कधी नाही विसरू शकत ,मी  मनातल्या मनात खूप चिडायचो कारण मला काही त्याच्या सारखं  क्रिकेट खेळणं जमायचं नाही असे बरेच किस्से आहेत आत्ता  आठवले कि वाटतं परत लहान  व्हावं ...... !

 मनात कुठलाच इगो न ठेवणारा ,
सतत आंत्मीयतेने विचारपूस करणारा जो असतो तोच खरा मित्र