लोकल ट्रेन

                                         


निघाली लोकल कर्जत 
मुंबईला गर्जत .
पहा प्रत्येक थांबा ,सांगतो मुंबईचा हंगामा. 

जाता कर्जत लागते वांगणी ,
एकू यायला लागती लोकल ची ती गाणी . 
 पुढे जाता येतं बदलापूर , जीथे वाढतो लोकल चा तो  पूर ,
तिथलाच तो कवी आहे आतुर, नाव त्याचं  आकाश शोधात आहे मुंबईत प्रकाश . 

कसता कंबर येतं  अंबरनाथ ,
येते ती नंतर विठठ्लाची वाडी .

 उल्हास जाता कल्याण ते येतं  ,
 मुश्कीलीने मिळाली जागा तर त्याच कल्याणचं  होत . 

थोडी विश्रांती घेता डोंबिवली लागते  ,
आणी ठाणे येता येता गर्दी ती ओसरते . 
 उठती तिथे माणसे  चांगली ,
 देती जागा थाकलेल्याला ,मिळते मुंबईत माणुसकी पाहायला . 

ठाण्य़ा  पुढे येतं ते कुर्ला , 
तिथ पुढे गर्दीचा ओघ ओसरला . 
चेत्य भूमीची ती भूमी म्हणती त्यास दादर ,
पुढे मस्जिद येता होते नमाज सादर . 

जाऊ द्यावं लागतं भायखला ,
शिवबाचं ते सिएसटी यायला … 
शेवटी लोकल पोहोचवते  की  हो मुंबईला .