काटा काढतो ते रक्त ,
फुलं चढवणारे मात्र भक्त.
फुला खालीच असतात कांटे ,
त्याप्रमाणेच आयुष्य हे जड वाटे.
इवल्याशा काट्यावर पडतो तो इवलासा पाय ,
वेदनेचं नाव असत ते काय ?
काट्य़ाच हे आयुष्य असतं काटो काट भरून ,
पाहता ते दुरून डोळे येतात भरून .
पण,
काटेच देतात जगण्याची हिम्मत ….
तेव्हांच तर कळते आयुष्याची किंमत .
-जाधावांचा आकाश