"षटकोन"




गरीबांच्या पोटांचा बनत चाललायं षटकोन ,
दोन वेळच अन्न देईल त्यांना कोण ?
सांगा देईल त्यांना कोन.. . ।।१। । 

कृषी प्रधान देश आपला म्हणतो आपण ,
पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतो  का कोण ?
सांगा सोडवतो का कोण. . . ।।१। ।

नोकऱ्यासाठी लागते आहे तरुणांची इथे रांग ,
कुपोषणाने मरणाऱ्य मुलांचा कोण वाचवेल प्राण ?
सांगा कोण वाचवेल प्राण … ।।१। ।

पोटासाठी भाकर नाही , नाही पिण्यासाठी पाणी ,
भूकबळीने मारणाऱ्यांची संख्या होईल का कमी ?
सांगा होईल का कमी … ।।१। ।

एफडीआय,सेझ साठी   पेटत इथे  'रण'  ,
 गरिबांचे स्वप्न इथे समजले जातात गौण.  

विमानाचं भाड   देखील होतं इथे  कमी,
पण गरिबांची भूक भागवेल का कोणी ?
सांगा भागवेल कोणी. . . ।।१। ।