कोणाच्याही… शब्दांच्या 'सड्याने ' वाहवत जायचं नसतं .
प्रेरणा घेणं एवढंच काय ते काम आपलं असतं…
दुसऱ्याच्या चुका दाखाउन आपल्या चुका लपवणं …
हे मनाला न पटणार असतं .
परिस्थितीला समोर करून मागे राहायचं नसतं ,
परिस्थितीशी दोन हात करून पुढे जायचं असत .
कोण आहात तुम्ही? काय आहात तुम्ही ? हे कोणालाच माहित नसत ,
स्वतःच आयुष्य स्वतःनेच 'सारवायचं ' असतं ,,,,,,,,