भिजलेल्या पानांना नांव काय ते देऊ ,
हे आयुष्य जगताना ,अजून किती दु:ख पिऊ .
मन सांगत आसतं स्वतः ला अरे नकोस तू भिऊ …नकोस तू भिऊ,
काही झालं तरी नको देउस जीव.
करणारे ते करतील फक्त तुझी कीव …फ़क्त तुझी कीव .
जीवाला तू जीव लाव ,
आयुष्याचा लगेल ठाव.
नको आणू तो खोटा आंव …
लोकं करतात ती फक्त कांव -कांव.
क्षीण आवाजाला लोक समजतात दिन ,
पण, तुम्ही तर आहात आयुष्य भेटलेला जीन .
-जाधवांचा आकाश