'अयुष्याला' आयुष्याची जाग आहे ,
प्रत्येक घडणारी गोष्ट आयुष्याचा भाग आहे.
दु:ख समजून घेण्याची गरज आज आहे , उद्याही राहील …।
दु:ख समजून घेणारा नक्कीच सुखात राहील.
दु:ख समजून घेण्यापेक्षा उमजून घेणे हा ही त्यातला भाग आहे ,
खरच आयुष्याला आयुष्याची जाग आहे .
चंद्राला त्याच्या शीतलतेशी नाज आहे ,
तर ,सूर्याला त्याच्या प्रकाशाशी ….
खरच खुप वाईट असत खेळणं आयुष्याशी .